‘आई कुठे काय करते’ ही टीव्हीवरची लोकप्रिय मालिका ठरली आहे. मालिकेतील जवळजवळ सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या अगदी मना जवळची बनली आहेत. मालिकाच काय त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील यशचे पात्र साकारणाऱ्या रियल लाईक पत्नीची चर्चा आहे जोरदार सुरू आहे. यशच्या रिअल लाईफ पार्टनरचे नाव कृतिका देव असे आहे.
आई कुठे काय करते’ मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारतो आहे. यापूर्वी अभिषेकने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे फार कमी लोकांना माहित आहे की अभिषेक देशमुखचं लग्न झालं असून त्याची पत्नीदेखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.अभिषेक देशमुखच्या पत्नीचं नाव आहे कृतिका देव. अभिषेक आणि कृतिका यांचे ६ जानेवारी २०१८ रोजी लग्न झाले आहे.
View this post on Instagram
सध्या कृतिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे. कृतिका देव ही मुळची पुण्याची आहे. तिने ‘प्राईम टाईम’ मालिकेत तिने काव्या आपटेची भूमिका केली होती.
कृतिकाने ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटातदेखील उत्तम काम केलं होतं. ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटातही ती झळकली होती. प्रथमेश परब सोबत ‘प्रेम दे’ या सीरिजमध्ये देखील तिने काम केलं. ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा ती उठून दिसली आहे. कृतिका सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती सतत शेअर करत असते. अभिषेकही बायकोसोबतचे अनेक फोटो सतत शेअर करताना दिसतो.
View this post on Instagram
अभिषेक आणि कृतिका दोघांची लव्ह स्टोरी तशी रंजक आहे. एका नाटकाच्या दरम्यान या दोघांची मैत्री झाली. अभिषेक नाटक स्वत: लिहीत होता आणि त्या सोबतच नाटकाची तयारीही करत होता. त्याच वेळी कृतिका हिची खूप मदत त्याला झाली. यादरम्यान दोघांची मैत्री घट्ट झाली.
कृतिकाला ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मुंबईला जायचं होतं. तेव्हा अभिषेक तिच्याबरोबर गेला होता. ऑडिशननंतर कृतिका या चित्रपटासाठी सिलेक्शन सुद्धा झालं. यादरम्यान दोघांमधील मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं.अभिनेता अभिषेक देशमुखने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेआधी ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत काम केलं होतं. यात त्याने पुनर्वसूची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.याशिवाय ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. अभिषेकने वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.