‘आई कुठे काय करते’ मालिकेत आला मोठा ट्विस्ट, अप्पा लगावणार अनिरुध्दच्या कानाखाली..

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील एका सामान्य स्त्रीची दाखवण्यात आलेली कथा प्रेक्षकांना खूपच भावली आहे. आणि सध्या

अनिरुद्धपासून विभक्त झालेली अरुंधती सुखाने तिचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, अरुंधतीला नात्यातून मोकळं केल्यानंतरही अनिरुद्ध तिची पाठ सोडायला तयार नाही आहे. तो सातत्याने तिच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता पुन्हा एकदा अनिरुद्ध अरुंधतीच्या घरात शिरला आहे.

सध्या सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो प्रसारित होतो आहे. ज्यामध्ये दाखवण्यात येत आहे की, अरूंधतीच्या गैरहजेरीत अनिरुद्ध पुन्हा एकदा तिच्या घरात चोरून शिरला आहे. आणि त्याचा हा डाव पुरता फसला आहे. कारण त्याचवेळी तिथे संजना आणि यश सोबत अप्पा पोहोचले आहेत. आणि त्यांनी अनिरुद्धला रंगेहाथ पकडले आहे.

अनिरुद्ध तिथे पोहोचल्यानंतर दरवाजाची बेल वाजते. अनिरुद्ध दरवाजा उघडतो तेव्हा समोर अप्पा येतात. आणि त्याला काय कळायच्या आत थोबाडीत मारतात, आणि म्हणतात, काय चाललय तुझं, काय झालंय अनिरुद्ध तुझं, काय करतोस तू हे, इतक्या खालच्या पातळीला जाशील? का आला होतास तू इथं, काय काम होतं तुझं, अरुंधती नसताना तू इथं का आलास? काय काम होतं तुझं. काय शोधत होतास तू? अशा शब्दांत आप्पा अनिरुद्धला जाब विचारतात. अनिरुद्ध नेमका अरुंधतीच्या घरात काय शोधत होता?, अरुंधतीला हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार या सगळ्यावर हे आपल्याला लवकरच कळेल.

दरम्यान, अनिरुद्ध पुन्हा एकदा अरुंधतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या गुड बुकमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे. तो अरुंधतीच्या गाण्याच्या रेकाॅर्डिंगलाही गेला होता. तिनं फटकारलं तरीही तो तिच्याशी प्रेमानं वागत होता. पण अरुंधतीलाही त्याच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज असल्याने, ती मात्र त्याला कोणतीही संधी देत नाही. संजनाशी मात्र अनिरुद्ध अक्षरश: वाईट वागतोय. त्याला संजनाकडून घटस्फोट हवाय. अरुंधती परत घरी यायला हवीय. हे सगळे झाल्यानंतर आता अनिरुद्ध अरूंधती च्या घरी रंगेहाथ सापडल्याने मालिकेत आता कोणते नवे वळण येईल? आता अप्पा अनिरुद्धला शिक्षा करतील का? आणि या सगळ्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल? याची तुफान चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. आता मालिकेत पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप