आई कुठे काय करते मालिकेत येणार मोठा ट्विस्ट .. गौरी आणि यश होणार का एकमेकांपासून वेगळे?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मालिकेत दररोज नवनवीन येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याच काम चोखपणे बजावत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे मुळात कौटुंबिक असणाऱ्या या मालिकेने चांगलीच लोकप्रियता संपादित केली आहे. आता पुन्हा अरुंधतीसमोर एक आव्हान उभं राहणार अरुंधती नाही तर तिला खंबीरपणे साथ देणारा तिचा मुलगा यशच्या आयुष्यात आता एक वादळ येणार आहे. गौरी आणि यश एकमेकांपासून कायमचे दूर होणार असल्याची परिस्थिती मालिकेत निर्माण झाली आहे.
आतापर्यंत प्रेक्षकांना ज्या गोष्टीची भीती होती तोच ट्विस्ट येणार आहे. आधी दाखवण्यात येणाऱ्या कथानकावरून गौरी यशला सोडून निघून जाणार का असा अंदाज प्रेक्षकांकडून लावण्यात येत होता. मात्र आता तो अंदाज खरा ठरतोय. गौरी आणि यश यांचं नातं आता संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपलं आहे.
दरम्यान, मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. त्यात देशमुख कुटुंबीय आनंदात दिवाळी साजरी करत आहे. गौरीसुद्धा अमेरिकेहून परत आली आहे. ती तिकडे गेली होती तेव्हा तिने यशला दुर्लक्षच केलं होतं. आता आल्यावर तीने यशला तिचा मोठा निर्णय सांगितलं आहे.
View this post on Instagram
गौरीला तिच्या कामासाठी परदेशात मोठी ऑफर आली आहे. त्यामुळे तिने परदेशी कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इथे यश तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आता ही बातमी समजताच त्यालाही मोठा धक्का बसला आहे. त्याला गौरीविषयी जी शंका होती तेच घडणार आहे. दुसरीकडे अनिरुद्ध पुन्हा एकदा यशला गौरीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अनिरुद्ध आणि संजना सुद्धा घटस्फोट घेणार आहेत. त्यालाच धरून अनिरुद्ध यशला गौरीविरुद्ध बोलत आहे. पण आता यश कोणता निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
मालिकेत कायम आईच्या बाजूने उभा राहणारा यश आता अरुंधती आणि आशुतोषला एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न करतोय. आशुतोष सोबत नवीन नातं जोडण्यासाठी तो अरुंधतीला पाठींबा देतोय. पण हे करत असताना आता त्याच्याच गौरीसोबतच्या नात्याची घडी विस्कटणार कि तो समजूतदारपणे हे सांभाळणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. गौरी यशला कायमची सोडून जाणार का? या सगळ्यात अरुंधती नेमकी काय भूमिका घेणार? ती हे सगळं कसं सांभाळणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.