आई कुठे काय करते मालिकेत होणार या अभिनेत्रीची एंट्री… मालिकेला मिळणार नवे वळण..
मालिका म्हंटल की त्यात ट्विस्ट आणि टर्न येणे ही तर काळया दगडावरची पांढरी रेघच आहे. आणि याचमुळे मालिकेला बहर येतो. अशीच ट्विस्ट ने भरलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते.. ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एका साध्या गृहिणीच्या आयुष्यात कितीतरी संकट येतात आणि ती त्यांना हसत तोंड देते हे या मालिकेत अगदी सुंदर पद्धतीने चितारले गेले आहे. दरम्यान, अरूंधती आता स्वतःच्या हिमतीवर सर्व काही हॅण्डल करू शकते. एकीकडे तिचे आणि आशुतोष चे प्रेम बहरत आहे तर दुसरीकडे देशमुख परिवारात चांगलीच उलथापालथ सुरू आहे. अशात आता मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या मालिकेत असे चित्र आहे की, आशुतोषच्या कुटुंबीयांशी संबंध ठेवायचे नाहीत यावरून आई अप्पांचा वाद सुरू आहे. तर संजना आणि अनिरूध्द यांच्यातील नात्यातही आलेला दुरावा आणखीन वाढत चालला आहे. पण या सगळ्यातही अरूंधती मात्र देशमुख कुटुंबाशी आपले नाते टिकवून आहे. अशा सगळ्या गुंत्यात अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही नव्या पात्रासह या मालिकेत येणार आहे. मग ती नात्यांचा गुंता वाढवणार की सोडवणार? हा मोठा प्रश्न समोर आहे.
आता तिच्या येण्याने मालिकेला नक्की काय काही वळण येणार हे पाहण्यासाठी त्यासाठीच प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. आणि याची जोरदार चर्चा नेटकऱ्यांमध्ये चालू आहे. तिचे हे पात्र काय असेल? आणि तिचे अरुंधती सोबत काय नाते असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात नक्कीच मिळतील.
मीरा जगन्नाथ ही यापूर्वी येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमो या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिने साकारलेली मोमोची भूमिका तशी विनोदी, वेंधळी अशी होती. तस पाहता हे पात्र छोट होत पण त्यातही मीराने आपल्या अभिनयाने अगदी जीव आणला होता. त्यानंतर मीरा दिसून आली ती म्हणजे बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये. या शोमध्ये ती विजेती झाली नसली तरी तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या शोमध्ये पुष्कर जोगसोबतच्या तिच्या खास मैत्रीचे अनेक किस्से रंगले.
यानंतर तिने तुझी माझी यारी या वेबसीरीजमध्येही उत्कृष्ट काम केलं. आता या मालिकेत ती कसे पात्र साकारते तो येता काळच ठरवेल नाही का?