आई कुठे काय करते मालिकेत येणार भन्नाट ट्विस्ट.. अरुंधती घेणार हा मोठा निर्णय..

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते’.. ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात स्थान पक्के करते आहे. दरम्यान, या मालिकेचे अनोखे कथानक आणि मालिकेतील कलाकार यांच्यामुळे ही मालिका अजूनही टीआरपीच्या रेस मध्ये आहे. सध्या मालिका बनवून ट्विस्ट येत आहेत त्यामुळे ही मालिका अतिशय रंजक अशा वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अरुंधती आणि अनुष्का अखेर एकत्र आले आहेत. दोघांनी एकमेकांच्या मनातील भावना सांगितल्या आहेत. पण अनिरुद्ध मात्र अरुंधतीच्या आयुष्यात अडचणी येण्यासाठी काहीतरी करतच असतो. आता मालिकेत पुन्हा नवाकोरा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित झाला आहे. प्रोमोनुसार देशमुखांच्या घरात संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतोय. पण त्यासोबतच छकुलीच्या वर्षाची देखील तयारी जोरात चालली आहे. घरात अभि आणि अनघाच्या चिमुकलीचे बारसे पाहायला मिळणार आहे. त्याच्याच तयारीसाठी देशमुख कुटुंबीय सज्ज झाले आहेत. पण तेव्हाच अनिरुद्ध मुद्दामहून कांचनला म्हणतो, ‘इथे तुम्ही बारशाची तयारी करताय, पण तिकडे लग्नाची तयारी सुरु आहे.’ कांचन म्हणते, ‘आता कोणाचं लग्न आहे’ तेव्हा अनिरुद्ध अरुंधती आणि आशुतोष असं म्हणतो. ते ऐकून कांचनला चांगलाच धक्का बसला आहे.

अरुंधती देखील अप्पांना स्वतःच्या लग्नाचा निर्णय सांगणार आहे. अरुंधती अप्पांना म्हणते, ‘काही दिवसांपूर्वी आशुतोषने मला लग्नाची मागणी घातली होती. त्यावर मी विचार केला. मी आशुतोषशी लग्न करण्याचा विचार करतेय.’ हे ऐकून अप्पांना देखील धक्का बसलेला दिसतोय. त्यामुळे अरुंधतीच्या या निर्णयावर आता देशमुख कुटुंबीय काय प्रतिक्रिया देतात ते पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अरुंधतीच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकट उभी राहत आहेत. नुकतंच अनुष्का नावाचा अडथळा तिच्या आयुष्यातून दूर झाला. अनुष्काने ‘अरुंधती मी तुमच्या मार्गातील अडथळा नाहीये. तो व्हायला मी इथे आलेली नाही. आशुतोषने लाईफ पार्टनर म्हणून जरी माझी निवड केली तरी त्याचं खरं प्रेम मात्र तुझ्यावर आहे. तूच त्याला सुखात ठेवू शकतेस’ असं म्हणत आता अनुष्का आता अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यातुन कायमची दूर जाणार आहे.

दरम्यान, अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर होणार का? एकीकडे घरात अभि आणि अनघाचं नातं तुटत असताना अरुंधती स्वतःच नवं नातं कसं जुळवणार, तिच्या या निर्णयात घरातील सगळे तिला साथ देणार का ? यावर अनिरुद्ध अजून काही कुरघोडी करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप