अभिला कशी रोखणार अरुंधती? आई कुठे काय करते मालिकेत आला आला मोठा ट्विस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने चाहत्यांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रत्येकाच्या मनात आपली अशी जागा मिळवली आहे. सोबतच मालिकेत येणाऱ्या नवनव्या ट्विस्टमुळे मालिकेत पुढे काय होतंय हे पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. दरम्यान, सध्या मालिकेत अनघा आणि अभिषेकच्या नात्यात तणाव असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारणही तसे आहे ते म्हणजे अभिचे विवाहबाह्य संबंध. या सगळ्याचा परिणाम छकुलीवर होत आहे. अनघा अभिला छकुलीच्या जवळही येऊ देत नाही. यामुळे ही मालिका अतिशय रंजक वळणावर पोहोचली आहे.

अभिचे विवाहबाह्य संबंंध असल्याने अनघा आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अनघाच्या मनात अभि विषयी प्रचंड राग आहे. अनघा अभिला बाळाच्या जवळ देखील येऊ देत नाही. त्यामुळे अभि आणि तिच्यामध्ये छकुलीमुळे रोज भांडण होत आहे. त्यांच्यात प्रचंड तणाव असतानाच मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे.

अभीच्या विवाहबाह्य संबंधामुळे अनघा त्याला छकुलीजवळ फार येऊ देत नाही. नुकताच स्टार प्रवाह वहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वर एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये अनघाने छकुलीला घेऊन गावी निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अनघा बाळाला घेऊन कायमची माहेरी निघून जाणार अशी परिस्थिती दिसत असतानाच अभि आणि अनघा यांच्यात जोरदार खटके उडताना पहायला मिळतात. अभि अनघाला म्हणतो ‘तू जर बाळाला माझ्यापासून दूर केलंस तर मी वाट्टेल ते करीन’. त्याच रात्री अनघाला कळतं की बाळ तिच्याशेजारी नाही. त्यामुळे अनघा बाळासाठी चांगलीच घाबरली आहे. तिला सतत छकुलीची काळजी वाटते.

बाळाला घेऊन अभि कुठेतरी गेला या भीतीने सगळ्यांना ती जागं करते. सगळे अभिला शोधायला बाहेर पडतात. पण अभि बाहेर बागेत बाळाला खेळवत बसलेले असतात. हे पाहून सगळेच भावुक होतात. अभिषेक आणि अनघा यांच्यात वाद असला तरी लेकीसाठी मात्र त्यांचा जीव तळमळतो आहे. अभी सोधत असतात. ते दोघे गार्डनमध्ये असल्याचे दिसते.

त्यामुळे हा भावनिक प्रसंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

दरम्यान, आता आलेल्या नात्यातील दुरावा अरुंधती कसा संपवेल? ती कोणते पाऊल उचलणार? अभिषेकला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होणार का? अनघा खरच गावी निघून जाणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी भागात मिळणार आहेत.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप