आई कुठे काय करते मालिकेवर भडकले चाहते.. संताप व्यक्त करत म्हणाले मालिका बंद करा..

0

स्टार प्रवाह ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा चाहत्यांच्या मनावर सुरुवातीपासूनच पगडा असल्याचे दिसून येतो. दरम्यान मालिकेचे कथानक हे चाहत्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे बनले आहे. सामान्य स्त्री, एक आई आणि तिच्याभोवती रचलेली ही मालिका नेहमी चर्चेत असते. अल्पावधीतच ही मालिका महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलीच नाही तर लोकप्रियही झाली आहे.

या मालिकेचा आणि त्यातील कलाकारांचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पहायला मिळते. मालिकेत येणारे रंजक वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची काम करत असतात. मात्र बऱ्याच वेळा मालिकेची कथा भरकटत चालली किंवा एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की, साहजिक प्रेक्षक कंटाळतात आणि त्या मालिकेवर आपला संताप व्यक्त करु लागतात. असंच काहीसं ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबाबत घडत आहे. या मालिकेवर काही प्रेक्षकांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असतेमात्र आता या मालिकेला प्रेक्षक कंटाळले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मालिकेत सुरु असलेला ट्रॅक काही प्रेक्षकांना रुचत नसल्याचं दिसून येत आहे. एका युजरने कमेंट करत ‘आईच्या नावाने सुरु झालेल्या मालिकेत इतकी प्रेम प्रकरणे दाखवत आहात. आई आजी झाल्यानंतर तिचं लग्न दाखवत आहात. आता ही मालिका तुम्ही बंद करुन टाका’. असा संताप या नेटकऱ्याने व्यक्त केला आहे.

मालिकेत सध्या आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. आशुतोषने नुकतंच अरुंधतीला लग्नासाठी मागणी घातली होती. यावेळी अरुंधतीने आशूतोषला होकार देत लग्न करण्यास संमती दिली आहे. दरम्यान अरुंधती आता आजीसुद्धा बनली आहे. नुकतंच तिच्या नातीचं बारसंसुद्धा पार पडलं. मालिकेत अभि आणि अरुंधती मधील तणाव तसेच आशुतोष आणि तिची जवळीक दाखवण्यात येत आहे ज्यामुळे मालिकेला रंजक वळण मिळत आहे. 

दरम्यान, अनघा आणि अभिच्या मुलीचं नाव काय ठेवलं हे ऐकण्याची सर्वांना उत्सुकता होती. या भागात अरुंधती नातीचं नाव सांगणार तोच यश पुतणीच्या नावाचा सुंदर बोर्ड घेऊन येताना दिसत. यावेळी अरुंधती आणि यश दोघे मिळून अनघाच्या बाळाचं नाव सगळ्यांना सांगतात. प्रोमोमध्ये बाळाचं पूर्ण नाव दाखवण्यात आलेलं नाही. पण ‘नकी’ असे दोन शब्द दिसत आहेत. यावरून बाळाचं नाव ‘जानकी’ असं ठेवल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप