स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. दरम्यान, अरूंधती म्हणजेच मधुराणी प्रभलकर हिने प्रकृती बिघडल्यामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर रुपाली भोसले हीची देखील सर्जरी झाली होती. आणि आता मालिकेतील अप्पांबद्दल एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. त्यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. काय झाले नक्की जाणून घ्या..
अभिनेते किशोर महाबोले यांनी या मालिकेतील अप्पांची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर किशोर महाबोले खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्यांच्या मुलाचे लग्न असल्याचे त्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद यांनी एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला आहे. यावेळी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी या मालिकेतील त्यांचे आप्पा अर्थात अभिनेते किशोर महाबोले यांच्याविषयी भरभरुन लिहिले होते. या व्हिडिओनंतर आप्पांचे विशेष कौतुक सोशल मीडियावर झाले. मात्र मिंलिंद यांनी हा व्हिडिओ डिलिट का केला, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मिलिंद यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आई कुठे काय करतेचा सेट होता. या बीटीएस व्हिडिओमध्ये आप्पांसह मालिकेची संपूर्ण कास्टही दिसत होती.
View this post on Instagram
मिलिंद यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, किशोर यांच्या अंगात ताप होता, त्यांना बसताही येत नव्हतं तरी त्यांनी मालिकेचं शूटिंग अडून राहू नये म्हणून काम पूर्ण केलं. या वयातही त्यांच्या या जिद्दीचं, कामाप्रति असणाऱ्या निष्ठेचं कौतुक झालं.
मिलिंद यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं होतं की, ‘आप्पांच्या अंगात ताप होता, अंगात कणकण होती, थकवा आला होता, त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं. त्यांना खूपच त्रास होत होता, गोळ्या औषध घेऊन सुद्धा दोन-तीन दिवस तो ताप उतरत नव्हता, कणकण थांबत नव्हती. पण ते शूटिंग करत होते कारण एपिसोड जायचा होता. आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल. ‘आई कुठे काय करते’ यशस्वी होण्याचं एक कारण हे पण आहे की कलाकार जीव ओतून काम करतात. आपल्या कामावर अतोनात प्रेम करतात’.
मात्र काही दिवसांसाठी किशोर महाबोले उर्फ आप्पा यांनी या मालिकेमधून ब्रेक घेतला आहे. मालिका देखील आता खूप वेगळ्या दिशेने जतन दिसणार आहे. त्यामुळे किशोर महाबोले काही दिवस आराम करून पुन्हा मालिकेत दिसणार आहेत.