स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. या मलिकने प्रेक्षकांच्या मनात अगदी हक्काचे स्थान मिळवले आहे. ज्यामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्र हे जणू त्यांच्या घरचेच झाले आहे. त्यामुळेच मालिका टीआरपी चार्टवर सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असते.
मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आणि कुटुंबात सतत काही ना काही ट्विस्ट येतच असतात. मालिकेत सुरुवातीला साधीभोळी गृहिणी असणारी अरुंधती आता मालिकेत स्वतःच्या पायावर उभी झाली आहे. सध्या ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक निर्णय घेत आहे. ती प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरं जात आहे. आणि तिचे हे यश पाहून अर्थातच अनिरूद्धचा होणारा जळफळाट ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना उस्फुर्त करत आहे.
View this post on Instagram
मात्र सध्या सुरु असलेल्या काही एपिसोडमध्ये अरुंधतीचे सीन फारच कमी किंवा जवळजवळ दिसतच नाहीत. त्यामुळे चाहते नाराज आहेत. अरुंधती नेमकी कुठे गायब झाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. , अरुंधतीने आपल्या खाजगी कारणासाठी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मालिकेमध्ये अरुंधती दिसत नसल्यानं तिने मालिका सोडली की काय? या चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर अशा चर्चा देखील सुरू होत्या. मात्र मधुराणीनं ही मालिका सोडली नसून तिने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. या ब्रेकनंतर ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकरने साकारलेली आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. आणि तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ती मालिकेमध्ये परत येईपर्यंत सध्या संजना आणि अनिरुद्धवर फोकस केलं जात आहे. अरुंधती आपलं खाजगी काम आटोपून लवकरच मालिकेत परतणार आहे. त्यामुळे तिने मालिका नक्कीच सोडली नाहीये.
सध्या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.कारण यामध्ये अनिरुद्ध चक्क संजनावर आरोप लावताना दिसून येत आहे. वास्तविक मालिकेत अनघाचा अपघात झाला आहे. ती जिन्यावरून उतरताना संजनाचा धक्का लागून खाली पडते. त्याचवेळी संजनासुद्धा तिथेच असते. त्यामुळे अनिरुद्धने संजनावर असा आरोप केला आहे की तिने अनघाला मुद्दाम धक्का दिला आहे. अनिरुद्धचं हे बोलणं ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. हा महाएपिसोड उद्या अर्थातच रविवारी २६ जूनला रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.