अनिरुद्ध ने रचला नवा डाव.. अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यात येणार नवे वादळ..

0

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने सध्या तीन वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासात मालिकेने चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळवले आहे. मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात खूप मोठे ट्विस्ट येत आहेत. अरुंधतीच्या आयुष्यात अनेक संकट येत आहेत.

मालिकेत एकीकडे अभि आणि अनघाचा संसार मोडण्याचा वाटेवर आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे तिच्या आशुतोष आणि तिच्यात असलेलं अंतर दिवसेंदिवस कमी होत असून दोघांमध्ये जवळीक वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच मात्र आता अनुष्काला या दोघांच्या नात्याबद्दल सत्य समजल्याने मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.

अनिरुद्धने अरुंधती आणि आशुतोष लग्न करणार असल्याचं सांगत तिला धक्का दिला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सध्या मालिकेत खरतर सध्या मालिकेत गायनाची स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत अरुंधती आणि अनुष्कामध्ये गाण्याची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळाली.

तसेच अनुष्का जरी अरुंधतीची मैत्रीण असली तरी तिला आता या दोघांविषयीचं सत्य समजलं आहे. त्यामुळे तीचा अरुंधतीवर राग उफाळून आला आहे. त्यामुळे अनुष्का पुरस्कार न स्वीकारताच स्टेजवरून निघून जाते. आता अनुष्का मालिकेत कोणतं नवं वादळ आणते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अशातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. सिरीयल जत्राने पोस्ट केलेल्या या प्रोमोमध्ये आशुतोष आणि अरुंधतीसमोर एक नवं आव्हान उभं राहणार असं दिसत आहे.प्रोमोनुसार स्पर्धेत अरुंधती आणि अनुष्का दोघीही स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार आलेले असतात. पण अरुंधती एकटी मुलाखत द्यायला नकार देते. ती म्हणते, ‘आम्ही दोघीही स्पर्धा जिंकलो आहोत. मग मुलाखत द्यायला अनुष्का सुद्धा सोबत असायला हवी.

 

View this post on Instagram

 

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

पण अनुष्का मात्र कुठे गेलीये याची कुणालाच कल्पना नसते. तेवढ्यात अनिरुद्ध मध्येच म्हणतो, ‘पण अनुष्का अशी का निघून गेली, काही झालंय का?’ त्याच्या या बोलण्याने सगळेच काळजीत पडले आहेत. मालिकेत आता अनुष्काच्या रागामुळे मालिकेला आणखी कोणता ट्विस्ट येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे

दरम्यान, अनुष्का नक्की कुठे गेलीये, सत्य समजल्यावर ती कोणतं पाऊल उचलणार, अनुष्का अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार की ती अरुंधतीच्या नवे वादळ निर्माण करेल हे पाहणे औतसुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप