पुन्हा खेळ रंगणार, नव्या गड्यांची नवी शाळा रंगणार बिग बॉस सिझन ४ चा जोरदार प्रोमो आला समोर…
छोट्या पडद्यावरील सर्वात रंजक असा रिॲलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम ओळखला जातो.गेल्या ३ सिझनपासून हा शो खूप घराघरात लोकप्रिय बनला आहे. बिग बॉसच्या घरात यातील स्पर्धकांमध्ये होणारे नवनवे वाद, भन्नाट राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनत असतो.
बिग बॉसचे तीनही पर्व चांगलच हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन मराठी आणि हिंदी चित्रपसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र गेल्या काही काळात चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता या शोचा होस्ट कोण याचे उत्तर समोर आलं आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या तीन पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्याशी तीन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. मात्र गेल्यावर्षी ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यानंतर बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. तो हा शो होस्ट करणार असल्याचेही बोललं जात होतं. नुकतंच यंदा बिग बॉसचे पर्व कोण होस्ट करणार याबाबतचा खुलासा झाला आहे. ‘कलर्स मराठी’ या वाहिनीने नुकतंच याबाबतचा एक प्रोमो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोत त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये एक पाठमोरा अभिनेता टोपी घालून पाहायला मिळत आहे. यावेळी पाठीमागे खेळाडू नवे, घर नव्हे आणि होस्ट.., असा आवाज ऐकायला मिळत आहे.त्यानंतर होस्ट हा शब्द ऐकताच तो अभिनेता ओरडतो आणि होस्ट मीच असे सांगतो. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते महेश मांजरेकर आहेत.
View this post on Instagram
त्यापुढे ते म्हणताना दिसत आहेत की “अरे वर्गात विद्यार्थी नवे असतात, पण मास्तर तोच… महेश वामन मांजरेकर, यावर्षी जरा वेगळी शाळा घेऊया.” या व्हिडीओला कलर्सने हटके कॅप्शन दिले आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये मी घेणार आहे ‘वेगळी’ शाळा!, तर पहायला विसरू नका मराठी बिग बॉसचा नवा कोरा सीझन फक्त कलर्स मराठीवर, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांनीही हा प्रोमो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच याआधीचा एक प्रोमोही त्यांनी त्या अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर हेच बिग बॉसचे चौथे पर्वही होस्ट करणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.