अलीकडेच जगभरात डॉटर्स डे साजरा झाला आहे. आणि या डॉटर्स डे दिवशी अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या लेकींविषयीच प्रेम व्यक्त करत पोस्ट्स शेयर केल्या. पण आपल्या लाडक्या परीचा बाबा कस मागे राहील बर… माझी तुझी रेशीम गाठ फेम श्रेयस तळपदे ने डॉटर्स डे दिवशी आपल्या मुलीसाठी अत्यंत भावूक पोस्ट शेयर केली आहे. जी खूपच पसंत केली जात आहे. काय लिहिले श्रेयसने त्याच्या या पोस्टमध्ये ? जाणून घ्या…
श्रेयसनं शेयर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘असं खूप कमी वेळा घडतं, जेव्हा तुम्ही स्वत:ला भाग्यवान समजता. आज तो दिवस आहे. माझ्या असं लक्षात आलं आहे की मी तीन सुंदर आणि प्रेमळ मुलींचा बाबा आहे. मी आद्या, मायरा आणि खुशी या तिघींमुळेच एक चांगला वडील बनू शकलो आहे. त्यांच्या गोड वागण्यामुळे हे शक्य झालं आहे आणि तेच स्क्रीनवर दिसून येतं. तेव्हा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन मला चांगला डॅड केल्याबद्दल धन्यवाद.’
View this post on Instagram
त्याची ही पोस्ट मनाला स्पर्श करून जाणारी आहे. त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर हार्ट इमोजी कॉमेंट करून त्याचे भरभरून प्रेम दिले आहे. श्रेयस आणि दीप्तीच्या मुलीचं नाव आद्या आहे. तिच्याबरोबर डॅड श्रेयसचं बाँडिंग आहेच. पण माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतली परीची भूमिका करणारी मायरा असेल किंवा आपडा थापडी सिनेमातली त्याच्या लेकीचं काम करणारी खुशी असेल, श्रेयस यांच्याशीही तितकाच जवळ आहे. सेटवर शूटिंग करताना या मुलींबरोबर अभिनेत्याचं नातं जुळलं आणि ते स्क्रीनवरही ते उठून दिसतंच.
दरम्यान, श्रेयसने फादर्स डेच्या दिवशी त्याच्या लेकीचा’ क्यूट व्हिडीओ शेअर केला होता. तो देखील असाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत, श्रेयसने एक शूज पायात घातला आहे आणि त्याची चिमुकली खाली गुडघ्यावर बसून त्याच्या शूजची लेस बांधत असताना दिसत आहे. तिला लेस बांधायला येत नाही हे माहित असूनही तो तिला ते करू देतोय. ‘चांगले आहेत का हे, की मोठे आहेत?’ असं श्रेयस तिला विचारतो. यावर, ‘बघते आता गाठ बांधून …. असं ती म्हणते. ‘ ती तुम्हाला राजाप्रमाणे वागवते. तिला माहित असतं तुम्हाला काय हवंय. सध्या मला तिचे चिमुकले हात पकडून फिरायचं आहे आणि ती मात्र त्याच हातांनी मला माझ्या शूजची लेस बांधायला शिकवतेय … तुझा डॅडा झालो,तुझा श्री खूप भाग्यवान आहे….. असं हा क्यूट व्हिडीओ शेअर करताना श्रेयसने लिहिलं होत. यावरून त्यांचे प्रेम कळून येत.