उत्कृष्ट अदाकारीचे अभिनय कौशल्य आणि चेहऱ्यावरील निरागस गोडवा या गुणांच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काने राज्य करणारी गुणी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे!! मराठी मधील अनेक लोकप्रिय झालेल्या सिनेमांमधून झळकलेली प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकताना दिसत आहे. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रार्थनाची फॅन फॉलोविंग तुफान वाढलेली दिसते! यामुळेच प्रार्थना देखील तिच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
अलीकडेच प्रार्थनाने तिच्या सोशल मीडिया हँडल वरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियाचा इंस्टाग्राम हॅण्डल वर प्रार्थना कमालीची ऍक्टिव्ह असते. यावरच तिने काही दिवस आधी एक पोस्ट शेअर केली होती, त्यामुळे प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल देखील झाला आहे.
इंस्टाग्राम अकाउंट वर प्रार्थनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक लहान कुत्रा दिसत आहे. थोडक्यात हा श्वान म्हणजेच प्रार्थनाचा नवीन पाहुणा आहे. या नव्या पाहुण्यासोबत प्रार्थना सध्या मज्जा मस्ती करत असून तिच्यावर जीवापाड प्रेम देखील करत असल्याचं दिसून येत आहे! ‘माझ्या नव्या चिमुकल्या मुलीला भेटा’ ‘मुव्हीला’ असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केलेला आहे.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार प्रार्थनाचा हा व्हिडिओ तिचा सह कलाकार आणि मित्र असलेला अभिनेता भूषण प्रधान यांने शूट केला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, तिची ही क्युट नवीन सोबती तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडत असल्याचे त्यांच्या कमेंट मधून दिसून येत आहे!
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अखेर यश आणि नेहाचा विवाह सोहळा अखेर संपन्न झाला आहे. मालिकेचे प्रेक्षक कित्येक दिवसांपासून या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आणि आता अखेरीस या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. मालिकेत यश आणि नेहा चा संसार फुलताना सगळ्यांना पाहायला मिळणार आहे मात्र अशातच या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे!! तो म्हणजे नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री मालिकेत होताना दिसणार आहे. हे पात्र साकारणारा अभिनेता कोण असेल? हे पाहणे प्रेक्षकांसाठी मोठे उत्कंठावर्धक ठरणार आहे एवढं नक्की!!