तेजस्विनी पंडित च्या घरी आला नवा पाहुणा.. पोस्ट शेयर करत दिली आनंदाची बातमी
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रानबाजार’ वेबसीरिजमुळे तेजस्विनी चांगलीच चर्चेत आली आहे. तेजस्विनी लोकप्रिय अभिनेत्री तर आहेच शिवाय ती उत्तम उद्योजिका देखील आहे. सोशल मीडियावर देखील तेजस्विनी खूपच सक्रीय असते. अलिकडेच तेजस्विनीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं नवीन कोरी गाडी खरेदी केली आहे. इतकंच नाही तर तिनं भारतीय ब्रँडची गाडी खरेदी करत देशप्रेम ही व्यक्त केली आहे.
गेल्या महिन्याभरात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच मराठी वेब सिरीजने धुमाकूळ घातला होता. ती वेब सिरीज म्हणजे रानबाजार… अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींच्या जोड गोळीने प्रेक्षक वर्गात जणू एक वादळच आणले. या मालिकेत तेजस्विनी पंडितच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना चाट पाडले. तेजस्विनी ही एक उत्तम अभिनेत्री आहे आणि सतत चर्चेत येत असते. आताही तिच्या खास पोस्ट मुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
तेजस्विनीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खास फोटो शेयर केला आहे. हा फोटो तर खास आहेच शिवाय याचे कॅपशन लक्षवेधी ठरत आहे. या फोटोत ती महिंद्राची एक्सयुव्ही ७०० या गाडी सोबत उभी आहे. तिने नुकतीच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीबरोबरचे फोटो सोबत भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनीनं म्हटलं आहे की, ‘गणपती बाप्पा मोरया, माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर शेअर करते आहे. माझी स्वतःची नवीन कार. माझ्यासाठी कार ही कधीच लक्झरी नव्हती, तर गरज होती.
मी स्वतःला एक आलिशान अशी भारतीय बनावटीची गाडी गिफ्ट करू शकले. यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे. आजपर्यंत खूप प्रवास केला. पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं आता नुसता प्रवास नाही करायचा आता प्रवासाची मज्जा लुटायची. आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा ‘बाबा’ तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं.’
तेजस्विनी ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोट्या पडद्याबरोबरच मोठ्या पडद्यावरील तिची कामगिरी लक्षणीय आहे. मराठी सिनेमा सृष्टीत बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची स्वतःची आगळी ओळख आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील समांतर, रानबाजार यांसारख्या सीरिजमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनयानंतर आता ती लवकरच निर्माती म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.