वनिताच्या घरी आली सुमितची वरात.. हास्य कल्लोळ उठवत पार पडला लग्नसोहळा..

0

गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. यातील बऱ्यापैकी जोड्या या हिंदी चित्रपट सृष्टीतीलच होते. पण सध्या मराठी टीव्ही इंडस्ट्री मधील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या लगणाच्या चर्चेने जोर धरला आहे. , आणि ती भन्नाट अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत काल म्हणजे २ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नबंधनात अडकली. दरम्यान तिच्या या लग्नसोहळ्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’शोमधल्या बऱ्याच मित्र-मंडळींनी हजेरी आपली उपस्थिती दर्शवली होती.

वनिता आणि सुमितवर सध्या चाहते आणि सेलिब्रिटी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसंच लग्नाचे फोटो, व्हिडिओही ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एक व्हिडिओ विशेष चर्चेत आलाय. हा व्हिडिओ आहे, वनितानं घेतलेल्या उखाण्याचा. वनितानं भन्नाट उखाणा घेत सुमितचं नाव सर्वांना ऐकवलं.

“टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा…सुमित, तूच माझा महाराष्ट्र तूच माझी हास्यजत्रा’.वनितानं घेतलेला हा उखाणा सगळ्यांनाच आवडला. व्वा..व्वा ..वा म्हणत सगळ्यांनीच जल्लोष केलाय. हा व्हिडिओ सध्या विशेष चर्चेत आलाय.

दरम्यान, लग्नासाठी वनिताने परिधान केलेल्या साडी आणि तिच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तिने पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडीनेसून मराठमोळ्या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता हे कॉम्बिनेशन चाहत्यांना देखील फार आवडलं. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला. वनिता व सुमितच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.वनिताच्या नवऱ्याविषयी सांगायचं झालं तर तो एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे.

वनिता आणि सुमित यांचे लग्न ठरल्यापासून त्यांची विशेष चर्चा होते आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये सुमित-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. वनिता-सुमितने सांगितल्याप्रमाणे ते दोघे आधीपासून मित्र होते.

वनिता पुढे असं म्हणाली की, लॉकडाऊनमध्ये ज्याप्रमाणे सर्वजण लुडो हा खेळ ऑनलाइन खेळत होते, तसंच त्यांच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुपही हा खेळ खेळायचा. दिवसभर सर्वांचा लुडो खेळून झाल्यानंतर हे दोघे आणखी काही वेळ लुडो खेळायचे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांची भेट झाली. वनिताने सांगितले की त्यानंतर ते एका ठिकाणी पिकनिकला गेलेले, तेव्हा त्यांच्यात आणखी छान मैत्री झाली. वनिता पुढे म्हणाली की तिला अफेअर-रिलेशनशिप या गोष्टींसाठी वेळ नव्हता, थेट लग्नासाठी तिची तयारी होती. गेल्या जानेवारीमध्ये घरी सर्वांशी बोलणी झाली आणि आता या वर्षीच्या सुरुवातीला ही जोडी लग्न करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.