या मराठी अभिनेत्रीचा पती आहे साऊथ चित्रपटामधील प्रसिद्ध चेहरा..पाहून विश्वास बसणार नाही

बॉलिवूडच्या अभिनेते आणि अभिनेत्रीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल लोकांना उत्सुकता असते. आपले मराठी अभिनेते आणि अभिनेत्री देखील लोकप्रियतेच्या बाबतीत कमी नाहीत बरं का! चाहते आणि प्रेक्षक यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जाणून घेण्यात देखील खूप स्वारस्य आहे. जसं या सिनेस्टार्सच्या ऑन स्क्रीन प्रेझेन्स बद्दल वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा होत असतात, तसं त्यांच्या ऑफ स्क्रीन लाइफ बद्दल देखील लोक ऑनलाइन आणि ऑफलाइन बोलत असतात.

 

तरुण पिढीने सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे डोक्यावर घेतलेल्या मराठी अभिनेत्रीमधील एक म्हणजे प्रार्थना बेहरे. हिंदी मधील झी टीव्ही वरील प्रचंड गाजलेल्या ‘पवित्र रिश्ता’ (२००९) या मालिकेत आपण प्रार्थनाला पहिल्यांदा पाहिले. ‘९x झकास हिरॉईन हंट’ च्या पहिल्या सीजन ची ती विनर आहे.

प्रार्थनाने मराठी बरोबरच हिंदी मालिका आणि चित्रपटांतून देखील कामे केली आहेत. ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ (२०१३), ‘मितवा’ (२०१५), ‘कॉफी आणि बरंच काही’ (२०१५), ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ (२०१६), ‘व्हॉट्सअप लग्न’ (२०१८) हे तिचे काही गाजलेले चित्रपट. ‘लव्ह यू मि. कलाकार’ (२०११) आणि ‘वजह तुम हो’ (२०१६) यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही प्रार्थना झळकली आहे. तर अशा या लाघवी अभिनेत्रीने २०१७ मध्ये लगीनगाठ बांधली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

प्रार्थनाने दिग्दर्शक व लेखक असलेल्या अभिषेक जावडेकरशी नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. अभिषेकने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या डिस्ट्रिब्युशनचे काम पाहिले आहे. अभिषेकचा ‘डब्बा ऐसपैस’ (२०१५), ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ (२०१५) या मराठी चित्रपटांच्या सहनिर्मितीमध्ये देखील सहभाग आहे.

प्रार्थना आणि अभिषेकची जोडी खरंतर इंडस्ट्री मध्ये क्यूट कपल म्हणून प्रसिद्ध आहे. लग्नाआधी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

प्रार्थना नेहमी सोशल मीडिया वर तिचे आणि अभिषेकचे फोटो शेअर करत असते. प्रार्थनाच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. तिची हसण्याची युनिक स्टाइल देखील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. लवकरच ती आपल्याला ‘छूमंतर’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. प्रार्थनाला अजून चित्रपट मिळत राहतील आणि ती अशीच आपल्या चाहत्यांना आपल्या सुंदर अभिनयाने खूष करत राहील यात शंकाच नाही. तिच्या या प्रवासात तिला तिच्या चाहत्यांबरोबरच तिच्या पतीचीही साथ मिळते आहे.

Leave a Comment

Close Visit Np online